Thursday, April 26, 2007
Life of an 11 am to 11 pm code monkey
resolving code issues, fixing bugs, creating new bugs(do I need to say this explicitly?) In short, working on existing work as well as creating more work for the future! What a way to ensure a consistent earning! Finally, getting out of that monotonous environment around 11 pm...what a great routine!
But he gets full monetary rewards for his monkygiri. Perhaps more than what his parents and grandparents ever earned! and his salary makes him blind enough to continue his monkeygiri without thinking about what he is losing...
losing the time to spend with his loved ones? losing the chance to ensure good health? losing the opportunity to spend the big fat salary he is earning? losing that which gives life its liveliness?
And yet, the breed of code monkeys seems to increase exponentially! Is that because such code monkeys are very much in demand?
पुतळा
तो पुतळा होता एका राष्ट्रपुरुषाचा…ज्याने समाजाला अनेक नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला अशा महान विचारवंताचा…
शहरातल्या भर गर्दीच्या चौकात अगदी मध्यभागी उभा असलेला…त्याच्या भोवती एक छोटेसे circle. वाहतुकीचे नियंत्रण सोपे जावे म्हणून बांधलेले. पुतळ्याच्या बाजूला circle मध्ये छोटीशी बाग. आखीव रेखीव कापलेली छान हिरवी झाडं, रंगीबेरंगी फ़ुलं आणि त्यामधोमध उभा असलेला तो पुतळा… लोकांना त्या महापुरूषाच्या विचारांची, त्याने दिलेल्या शांतीच्या शिकवणुकीची सदैव आठवण रहावी ह्या सद्हेतूने बांधलेला..
एका रात्री कुणीतरी त्या पुतळ्याच्या गळ्यात चपलांचे हार घातले. सकाळी जशी वर्दळ वाढायला लागली तशी बातमी सगळीकडे पसरली. लोकं पेटून ऊठली. चर्चा चालू झाल्या. “आमच्या नेत्याच्या गळ्यात असा चपलांचा हार घातला जातो म्हणजे काय? केवढा मोठा अपमान आहे हा! ह्या अपमानाचा बदला घ्यायलाच हवा.” नारेबाजी चालू झाली. चिडलेल्या लोकांनी पहिला मोर्चा काढला तो महानगरपालिकेच्या कार्यालयावर…सरकारविरोधी घोषणा, बसची तोडफ़ोड, महानगरपालिकेच्या आवारात दगडफ़ेक, बंदची मागणी…मग लोकांना आवरायला पोलीस.... लाठीमार झाला. अश्रुधूराची नळकांडी फ़ोडली गेली. लोकं जखमी झाली. दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. सुरळीतपणे चालू असलेले दैनंदीन व्यवहार ठप्प व्हायला लागले. अस्वस्थतेचे परिणाम सगळ्या शहरात दिसायला लागले. जमाव करून, काठ्या घेउन, घोषणा देत देत लोकं इकडे तिकडे धावायला लागले…दिसेल त्याची तोडफ़ोड करायला लागले. खूप नुकसान झाले…वाहनांचे, इमारतींचे, माणसांच्या आयुष्यांचे …ज्यांचा ह्या घटनेशी प्रत्यक्षपणे संबंध होता असेही आणि ज्यांचा काहीही संबंध नव्हता असेही हकनाक बळी पडले…
ज्या महापुरूषाने शांती, अहिंसा, खरेपणा, माणसामाणसांतली समानता ही तत्त्वे लोकांना शिकवण्यासाठी आयुष्य वेचले, स्वतःच्या आचरणातून आदर्श घालून देण्यासाठी सतत प्रयत्न केले, त्याच्या पुतळ्याच्या अवहेलनेमुळे केवढी ही अशांतता…. केवढी ही हिंसा… केवढी ही हानी…
काय दिसलं ह्या सगळ्यातून? लोकांच्या मनात त्या समाजसुधारकाबद्दल असलेला आदर? त्याच्या तत्त्वांची केलेली जपणूक? की त्याच्यावरील प्रेमापोटी त्याच्याच तत्त्वांना घातलेली मुरड? की फ़क्त सद्सद् विवेकबुद्धीचा अभाव? पैशाचा, वेळेचा आणि मालमत्तेचा अपव्यय? की विचार न करता विध्वंसक होणारी mob mentality?
का हे सगळं एक कूट षडयंत्र असावं? सत्ताधारी पक्षाला खाली खेचण्यासाठी, त्यांच्या कारकीर्दीत किती अराजक माजले आहे हे लोकांना दाखवून देण्यासाठी घडवून आणलेलं नुसतं एक नाटक? सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतील अशा लोकांनी मुद्दामून ऊठवलेलं एक वादळ? पण मग त्यासाठी एवढी हिंसा? एवढी हानी?
खरं तर त्या समाजसुधारकाने केलेले कार्य एवढे मोठे आहे की काही चपलांच्या हारांनी त्याचं महत्त्व कधीच कमी झालं नसतं. लोकांच्या मनातलं त्याच्याबद्दलचं आदराचं स्थान कधीही ढळलं नसतं…
Exploring a new dimention!!!
but it's said that better late than never....as writing was always my passion...a fulfilling experience every time...major outlet to my emotions.......
i have written quite a lot of stuff since my school time...I used to write on any piece of paper i found at that moment....remaining pages of the notebook in which i m solving my maths examples, few last blank pages of the book that i m reading or any damn piece of paper that's quickly available to collect the outburst of ideas and emotions at that instant....
Surprisingly, few days back, i was cleaning up my messy cupboards and i found a small plastic bag which was tightly packed with all papers, notepads, diaries of all my previous writings....the only proof of my old passion! That passion, which was somehow overlooked since the time i entered into the professional world and life simply started running between the week ends!! Week days completely full of hectic work schedules, running behind the deadlines, managing the customer expectations, debugging my own as well as somebody else's codes... And on week ends, lots and lots of sleep!!! Then the week starts once again..! The typical Monday morning syndrome where u don't feel like going to office and still have to live with the fact that there is no choice......!!
Coming back to the point, the plastic bag tightly packed with papers and all my previous writings just reminded me that once upon a time i HAD this passion and should start writing once again to experience the the feeling of fulfillment and a soothing effect that comes when i m done pouring my heart out!!
As a result, i m here!! and you are the guinea-pig of my newly found (!) old passion!!